डॉ. वेदप्रकाश विद्यामंदिर शाळेत “दिंडी सोहळा ” उपक्रमात चिमुकल्याचा अविष्कार …

परंडा (प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्त डॉ. वेदप्रकाश विद्यामंदिर मध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दिनेश मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या अगोदर तीन दिवस आधी…

अधिक बातमी वाचा...

अखेर सहशिक्षक पी. एम. मोहोळकर निलंबित..

परंडा, (प्रतिनिधी)दि. ३- तालुक्यातील चिंचपूर बु. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे सहशिक्षक पी. एम. मोहोळकर हे वारंवार मद्यप्राशन करून शाळेत येत असल्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मोहळकर हे २८ जून रोजी मद्यप्राशन करून शाळेत आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांचा मद्यप्राशन करून…

अधिक बातमी वाचा...

श्री क्षेत्र भगवान बाबा दिंडीचे कुंभेफळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले..

परंडा(प्रतिनिधी) संत भगवान बाबा महाराज पालखी मधील वारकरी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आषाडी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गड येथुन विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूर कडे निघालेल्या श्री क्षेत्र भगवान बाबा गड दिंडीचे कुभेफळ येथे , दि.30 जून सोमवार रोजी सयाकाळी पाच वाजता आगमण होताच दिंडीचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. कुभेकळ येथे…

अधिक बातमी वाचा...

प्रा डॉ शहाजी चंदनशिवे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

परंडा(प्रतिनिधी) श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांना रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी शिर्डी येथे बी दी चेंज फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे . त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेत या सामाजिक संस्थेने त्यांना राज्यस्तरीय आदर्श…

अधिक बातमी वाचा...

रामभाऊ पवार शेतकऱ्याच पोर झाल परंडा तालुक्यातील विकासरत्न..!

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील साधारण शेतकऱ्याच पोर म्हणजे रामभाऊ भगवान पवार हे पदवी पर्यंत शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायासाठी पुणे शहरात जाऊन व्यवसायाचे धडे घेत राहिले . आपल्या सोज्वळ वाणीमुळे पुण्यातील व्यवसायीकांनी त्यांना जवळ केले . या संधीच सोन करायच रामभाऊनी स्वप्न पाहिल आणि पुण्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारूपास आले . अहोरात्र मेहनत…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

परंडा(प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

संपादकीय लेख –
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.

आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.

स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.

आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.

MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
“सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”

ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी!
राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.


error: Content is protected !!