प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी अखेर मंजूर

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेचा ठराव संमत; लवकरच निधी वितरण होणार माझं गांव माझं शहर | धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यात येणारा ५ टक्के निधी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या निधीच्या वितरणासाठी प्रहार संघटना यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मागील दिवाळीपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, प्रहार…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग बांधवांसाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन;दिव्यांग सेवक तानाजी घोडके

प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांनी संधीचा लाभ घ्यावा : आयोजकांचे आवाहन माझं गांव माझं शहर | परंडा परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच ज्यांच्याकडे अद्याप अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग अत्याचार प्रकरणातील आरोपींना बेड्या; आंबी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक .

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी)  परंडा तालुक्यातील चिंचपूर बु. येथे एका दिव्यांग व्यक्तीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आंबी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून त्यांची रवानगी धाराशिव जिल्हा कारागृहात केली आहे. पोलिसांच्या या त्वरित भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. नेमके प्रकरण काय? चिंचपूर बु….

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे निर्णय; कर्ज मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

माझं गाव माझं शहर | प्रतिनिधी  मुंबई : दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कर्ज मर्यादा वाढविण्यासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले. बैठकीत दिव्यांगांसाठी सध्याची वैयक्तिक कर्ज मर्यादा केवळ ५० हजार रुपये असल्याचे नमूद करत ती अपुरी असल्याची…

अधिक बातमी वाचा...

चिंचपूर (बु) येथे दिव्यांग कुटुंबावर हल्ला; आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी

📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे अशोक भराडे दिव्यांग कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिकांकडून जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवमध्ये दिव्यांग शेतकऱ्याची न्यायासाठी भटकंतीत; कारवाई कुठे? निराशेतून आत्मदहनाचा इशारा..

धाराशिव,दि १५(माझं गांव माझं शहर) : दिव्यांग शेतकरी विठ्ठल गायकवाड यांचे स्वतःचे मौजे बामणी ता जि धाराशिव येथे गट नं ०२ मध्ये ३१ आर क्षेत्र आहे यांना गेल्या तीन वर्षांपासून स्वतःच्या शेतात वहिवाट करण्यास अडथळे निर्माण होत असून, यामुळे त्यांची शेती पडीक राहिली आहे. पोटापाण्याचा मुख्य आधार असलेली शेती बंद पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ…

अधिक बातमी वाचा...

प्रमाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात ; दिव्यांग उद्योग समूहाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

परंडा (प्रतिनिधी) :प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात पारदर्शक प्रशासन, शिस्तबद्ध कामकाज आणि जनहिताचे निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. अशा अधिकाऱ्यांची…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपालिकेकडून दिव्यांगांसाठी ५% निधीचे वाटप; ₹३,७४,४०० रुपयांचा लाभ

परंडा (प्रतिनिधी) : परंडा नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेल्या ५% निधीतून एकूण ₹३,७४,४०० रुपयांचे वाटप शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना करण्यात आले. मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली व नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील दिव्यांग बांधवांच्या विविध गरजा लक्षात घेऊन हा निधी वितरित करण्यात आला असून, यामध्ये सहाय्यक साहित्य, उपजीविकेसाठी आवश्यक साधने तसेच…

अधिक बातमी वाचा...

21 वर्षांत 25 वेळा बदली; तुकाराम मुंडे यांना पुन्हा तीन विभागांची जबाबदारी..

मुंबई | प्रतिनिधी राज्य प्रशासनात पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका पाहायला मिळाला असून, 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कडक व निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंडे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, मुंडे यांच्या कारकिर्दीतील ही आणखी एक बदली ठरली असून, गेल्या 21 वर्षांत तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली आहे. प्रशासनात इतक्या…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्यात वाढ ; UDID-आधार लिंक व DBT नोंदणी अनिवार्य

धाराशिव,दि.२५ मार्च (माझं गांव माझं शहर) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय १५ सप्टेंबर २०२५ अन्वये दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणा-या अर्थसहाय्यात १५०० रुपयांवरून २५०० रुपये वाढ करण्यात आलेली असून ही वाढ ऑक्टोबर २०२५ पासून लागू करण्यात आलेली आहे.तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय २४ फेब्रुवारी २०२६ अन्वये विशेष सहाय्य…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात शेतरस्त्यासाठी दिव्यांग शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा

धाराशिव, दि. 23 मार्च 2026 — शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता मिळावा या मागणीसाठी स्थानिक दिव्यांग शेतकरी नारायण हनुमंत साखरे यांनी प्रशासनाला इशारा दिला असून, मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात साखरे यांनी नमूद केले आहे की, त्यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय, धाराशिव येथे शेतरस्त्यासाठी अर्ज…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अनिवार्य; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचे जाहीर आवाहन

धाराशिव : विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालय धाराशिवच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी जाहीर आवाहन केले आहे.शासनाच्या निर्देशानुसार : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!