पालखी मार्गाचे काम रखडले; वारकऱ्यांच्या संयमाचा अंत, प्रशासन मात्र गाढ झोपेत!

परंडा-मुंगशी साडेतीन किलोमीटर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर; नाथांच्या पालखीपूर्वी काम पूर्ण होणार का? परंडा | माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके) आषाढी वारी जवळ येत असताना परंडा ते मुंगशी दरम्यानच्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वारकरी, ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात…

अधिक बातमी वाचा...

पंचायत समितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

परंडा, प्रतिनिधी : पंचायत समिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, माननीय गटविकास अधिकारी गायकवाड साहेब, श्रीनिवास शिंदे साहेब, गुलाब शिंदे, तांबोळी साहेब तसेच बिरदेव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या…

अधिक बातमी वाचा...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील प्रवेशासाठी अर्ज करा – प्राचार्य केशव पवार

परंडा – परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया ०१ जूनला उपलब्ध करून दिली जाणार आहे. कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ०३व्यवसायासाठी ६०जागा उपलब्ध आहेत. यामध्ये अभियांत्रिकी गटात इलेक्ट्रिशिअन, वेल्डर तर बिगरअभियांत्रिकी गटात ड्रेसमेकिंग,…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदन

परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यात वीज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने राज्य शासन व महावितरण प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, बसवलेले मीटर काढून जुने मीटर पूर्ववत करावेत तसेच…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव एलसीबीचा मोठा दणका; अट्टल घरफोड्या अटकेत, ३२ गुन्ह्यांचा उलगडा, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

माझं गांव माझं शहर (परंडा) दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला अट्टल आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. मिळालेल्या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन…

अधिक बातमी वाचा...

५.३९ कोटींच्या गाळ काढण्याच्या कामांवर संशय; १७ तलावांच्या कामांची चौकशीची मागणी

माझं गांव माझं शहर | विशेष वृत्त ✍️ मृद व जलसंधारण विभागाच्या तब्बल ५ कोटी ३९ लाख रुपयांच्या गाळ काढण्याच्या कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील १७ तलावांमधून गाळ काढल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची रक्कम उचलल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अनेक तलावांमध्ये प्रत्यक्षात गाळ काढण्यात आलेलाच नाही. मात्र, ग्रामपंचायतींची…

अधिक बातमी वाचा...

प्रशिक्षकाच्याच सांगण्यावरून रोलर ओढत असताना आरवचा मृत्यू? आयोजक व प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा

बार्शी -माझं गांव माझं शहर : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातप्रकरणी आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलगा आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय १५) याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३०…

अधिक बातमी वाचा...

आ. तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आ. तानाजीराव सावंत यांच्या पुनरागमनाची चर्चा; धाराशिवच्या राजकारणात पुन्हा खळबळ परंडा | माझं गांव माझं शहर | दि. ३० मे दिल्लीतील राजकीय हालचालींनंतर राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून धाराशिव जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा सत्तेच्या राजकारणात चर्चेत आले आहे. माजी आरोग्यमंत्री तथा तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात…

अधिक बातमी वाचा...

वडिलांचे छत्र हरपलेल्या कन्येने पोलीस भरतीत यश मिळवत आईचे स्वप्न केले साकार

परंडा | माझं गावं माझं शहर परंडा येथील भटक्या समाजातील वैदू समाजाची कन्या कु. गौरी सुभाष घोरपडे हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून आपल्या आईचे स्वप्न साकार केले आहे. तिची महाराष्ट्र पोलीस दलात नवी मुंबई येथे निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते…

अधिक बातमी वाचा...

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करा ; जिल्हाधिकारी श्री.पूजार यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश

धाराशिव,दि.२९ मे (माझं गांव माझं शहर) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात यावा,अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज २९ मे रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या…

अधिक बातमी वाचा...

सुजितसिंह ठाकूर लय मोठ्या ताकदीचा नेता! अमित शाह शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करू शकतात; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संपादकीय | तानाजी घोडके | माझं गांव माझं शहर मुख्य मुद्दे : उमेदवारी का मिळावी ? विद्यार्थी दशेपासून भाजपसाठी संघर्ष पक्षातील महत्त्वाची पदे विधान परिषदेत अभ्यासपूर्ण मांडणी मोठ्या राजकीय मोहिमांचे नियोजन विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग ‘माणसातला माणूस’ अशी ओळख शेवटच्या क्षणी मोठा निर्णय? राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून, शेवटच्या काही…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात बकरी ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर हजारोंनी अदा केली नमाज

परंडा | प्रतिनिधी त्याग, बलीदान आणि बंधुभावाची परंपरा जपणारी बकरी ईद परंडा शहरात गुरुवारी (२८ मे) मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मौलाना जफर अली काझी यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज अदा केली. यावेळी देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी विशेष…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!