राज्यसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १८ जूनला मतदान

मुंबई : सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांनी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. संबंधित जागेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १ जून २०२६ पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून १८ जून २०२६ रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून २०२६ आहे. ९ जून रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून ११ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल.

१८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. तसेच, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

#राज्यसभानिवडणूक
#केंद्रीयनिवडणूकआयोग

error: Content is protected !!