कायद्याचा भंग करणाऱ्या लवंगी मिरची कला केंद्रावर धाड ५०,१३,००० चे साहित्य जप्त..

बार्शी, माझं गांव माझं शहर : मा. पोलीस अधिक्षक सो यांचे आदेशाप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलींग, नाकाबंदी करून अवैध इसमांवर कारवाई करणेची धडक मोहीम चालू आहे. दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १:३० वा. चे सुमारास बार्शी ते लातूर जाणाऱ्या रोडवरील लवंगी मिरची या कलाकेंद्रामध्ये शासनाने दिलेल्या वेळेनंतर देखील कलाकेंद्र चालवून कायद्याचा भंग करीत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमामणे पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन धाड टाकली असता कलाकेंद्र चालु असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणी नृत्य करणारे नृत्यंगना, ग्राहक, चालक, मालक असे एकूण ७२ लोकांवर भारतीय न्याय संहिता, महा. पोलीस अधिनियम, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ठिकाणावरून ५०,१३,४६० चे साहित्य त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने व देशी दारूच्या बाटल्या असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतूल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सह पोलीस अधिक्षक अंजना कृष्णा यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा.पो. नि. महेश माने, पो.उपनिरीक्ष बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोसई चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ/१७४७ धनराज केकाण, पोहेकॉ/१६९ डुकळे, पोहेकॉ/४३२ स्वाती काटे पोकॉ/७४७ राहूल बोंदर, पोकॉ/१०२७ बिरकले, पोकॉ/१०७३ कांबळे, पोना/५९२ चौधरी, चालक पोकॉ डी-२४ खराडे महिला यांनी केली आहे…

error: Content is protected !!