वाळू माफियांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; सीना-उल्का नदीपात्रातील तीन बोटी उद्ध्वस्त
माझं गांव माझं शहर | प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील सीना आणि उल्का नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तहसीलदार नीलेश काकडे यांच्या विशेष आदेशानंतर कपिलापुरी परिसरात धाड टाकून वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन अवाढव्य बोटी जागीच उद्ध्वस्त करण्यात आल्या. प्रशासनाच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे तालुक्यातील वाळू…
