कन्हेरवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त; एक आरोपी ताब्यात, एक फरार

धाराशिव | प्रतिनिधी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात धडक कारवाई करत दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. दि. १८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे…

अधिक बातमी वाचा...

परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत अनधिकृत अतिक्रमणांवर २३ मे रोजी कारवाई

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर शनिवार, दिनांक २३ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयीन आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्याच्या हालचालींना वेग आला असून, बाजार समिती प्रशासनाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. परंडा कृषी उत्पन्न बाजार आवारातील जमिनीबाबत २०१३पासून समितीच्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. २०१७…

अधिक बातमी वाचा...

गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री संत ज्ञानेश्वर प्रशालेत सत्कार

परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशी प्रशाला येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात धक्कादायक प्रकार : सोने खरेदीच्या बहाण्याने महिलेकडून सोन्याचा टॉप्स लंपास

वर्धमान ज्वेलर्समध्ये थरारक घटना माझं गांव माझं शहर | परंडा परंडा शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात असलेल्या प्रसिद्ध वर्धमान ज्वेलर्समध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने चक्क सोन्याचा टॉप्स लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने…

अधिक बातमी वाचा...

सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द) येथे मुख्याध्यापक एन. एम. गांधले यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

माझं गांव माझं शहर,परंडा / प्रतिनिधी सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द) येथील मुख्याध्यापक श्री एन. एम. गांधले यांचा सेवापूर्ती निमित्त आयोजित निरोप व सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाल्याने शाळेच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता विजयकुमार वाघमारे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून…

अधिक बातमी वाचा...

पत्रकारांच्या संरक्षणासाठी संदीप काळे यांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राहुल गांधी यांना पत्र

“व्हॉइस ऑफ मीडिया”कडून पत्रकार संरक्षण कायदा, विमा योजना आणि मीडिया स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी माझं गांव माझं शहर, मुंबई : देशातील पत्रकार आणि पत्रकारितेच्या गंभीर प्रश्नांवर आता राष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्यात येत असून, “व्हॉइस ऑफ मीडिया”, “व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम”चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,आणि…

अधिक बातमी वाचा...

साकत तलाव परिसरातून तरुण बेपत्ता; परंडा तालुक्यात खळबळ

माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी परंडा तालुक्यातील रोहकल येथील कृष्णा सतिष शिंदे (वय २६) हा तरुण साकत तलाव परिसरातून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रमेश सतिष शिंदे यांच्या जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक २६/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर शहरातील पार्किंगच्या नावाने होणारी अतिरिक्त वसुली तात्काळ बंद;संबंधितांवर चौकशीची मागणी

तुळजापूर (माझं गांव माझं शहर ) : तुळजापूर शहरात श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली अतिरिक्त वसुली अखेर प्रशासनाने बंद केली असून, शिवसेना पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या प्रश्नावर शिवसेना शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देत भाविकांची आर्थिक लूट थांबविण्याची…

अधिक बातमी वाचा...

लोखंडी कोयत्याने वार तरून गंभीर जखमी; परंडा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा

चुलत बहिणीच्या लग्नात नाचल्याच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सरणवाडी येथे चुलत बहिणीच्या लग्नात सर्वांसमोर नाचल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक भारत जाधव (वय ३०, रा….

अधिक बातमी वाचा...

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर मंडळ विभाग सोनारी ता. परंडा येथे संपन्न.

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) सोनारी येथील जि.प. शाळा येथे सोनारी मंडळामील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर शुक्रवार दि. १५ मे. २०२६ रोजी संपन्न झाले. सदर शिबीरामध्ये नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यान आले , यामध्ये प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र वाटप, डिजीटल सातबाराचे वाटप प्रलबीत फेरफार निकाली काडणे शिधापत्रिका वाटप , आधार अपडेशन, पशुसंवर्धन…

अधिक बातमी वाचा...

कांद्याला योग्य भाव व अनुदान मिळावे; २८ मे रोजी परंडा-करमाळा रस्त्यावर ‘रास्ता रोको”छावा’ संघटना व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा थेट मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन

माझं गांव माझं गांव(प्रतिनिधी) परंडा:बाजारपेठेत कांदा पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला हमीभाव आणि त्वरित योग्य अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी ‘छावा’ संघटना आणि परंडा तालुक्यातील सकल शेतकऱ्यांच्या वतीने येत्या २८ मे २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर परंडा-करमाळा रोडवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातील गंभीर…

अधिक बातमी वाचा...

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा महाघोटाळा उघड ; “माफी मागा, अन्यथा सक्तीने निवृत्त व्हा!” — उच्च न्यायालयाचा राज्य प्रशासनाला दणका

राज्यातील शासकीय यंत्रणेला हादरवून सोडणारा बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अनेक वर्षे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या, पदोन्नती, आरक्षण आणि विविध शासकीय लाभ घेतल्याचा संशय असलेल्या कर्मचाऱ्यांवर आता थेट कारवाईचे संकेत मिळाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे प्रशासन, आरोग्य विभाग आणि कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारला…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!