धाराशिव एलसीबीचा मोठा दणका; अट्टल घरफोड्या अटकेत, ३२ गुन्ह्यांचा उलगडा, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

माझं गांव माझं शहर (परंडा) दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला अट्टल आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. मिळालेल्या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन…

अधिक बातमी वाचा...

आ. तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आ. तानाजीराव सावंत यांच्या पुनरागमनाची चर्चा; धाराशिवच्या राजकारणात पुन्हा खळबळ परंडा | माझं गांव माझं शहर | दि. ३० मे दिल्लीतील राजकीय हालचालींनंतर राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून धाराशिव जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा सत्तेच्या राजकारणात चर्चेत आले आहे. माजी आरोग्यमंत्री तथा तानाजीराव सावंत यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात…

अधिक बातमी वाचा...

दुःखाचा डोंगर कोसळला : नदीतील मोटरचा शॉक बसून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

परांडा | माझं गांव माझं शहर परांडा तालुक्यातील कपिलापुरी गावावर शुक्रवारी दुःखाचा डोंगर कोसळला. नदीतील विद्युत मोटर बाहेर काढत असताना विजेचा तीव्र शॉक बसून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिलापुरी येथील शेतकरी अनिल श्रीधर देवळकर (जैन) यांच्या शेतातील विद्युत…

अधिक बातमी वाचा...

विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील २५२ सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

धाराशिव | प्रतिनिधी,तानाजी घोडके धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तीनही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तब्बल २५२ सदस्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव, बीड…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात बकरी ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर हजारोंनी अदा केली नमाज

परंडा | प्रतिनिधी त्याग, बलीदान आणि बंधुभावाची परंपरा जपणारी बकरी ईद परंडा शहरात गुरुवारी (२८ मे) मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९ वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मौलाना जफर अली काझी यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज अदा केली. यावेळी देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी विशेष…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी,कृ.उ.बा. समितीला निवेदन .

माझं गांव माझं शहर,परंडा(दि. २८ मे २०२६) : छावा संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा संपर्क प्रमुख अमरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. सध्या कांदा पिकास योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना कांद्याला अत्यल्प…

अधिक बातमी वाचा...

करंजा येथील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी

परंडा | माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी (दि. २८ मे) सप्टेंबर २०२५ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे करंजा येथील मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र नुकसान भरपाईच्या पंचनाम्यात तलाठी व कृषी सहाय्यक यांनी बोगस लाभार्थ्यांचा समावेश करून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा गंभीर आरोप करत करंजा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे सखोल चौकशीची…

अधिक बातमी वाचा...

टेंभुर्णीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना शंभूराजे जगताप यांचे निवेदन; करमाळा एमआयडीसीच्या पाणीप्रश्नी तातडीच्या कारवाईची मागणी

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट; कृषीपूरक उद्योगांसाठीही स्वतंत्र आराखडा सादर माझं गांव माझं शहर | सोलापूर / टेंभुर्णी प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेल्या एमआयडीसी पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रमुख नेतृत्वाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची टेंभुर्णी येथे समक्ष भेट घेतली. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे…

अधिक बातमी वाचा...

भाजपकडून सुजितसिंह ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग; बावनकुळे यांची मुंबईत भेट

माझं गांव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत जोरदार…

अधिक बातमी वाचा...

प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी अखेर मंजूर

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेचा ठराव संमत; लवकरच निधी वितरण होणार माझं गांव माझं शहर | धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यात येणारा ५ टक्के निधी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या निधीच्या वितरणासाठी प्रहार संघटना यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मागील दिवाळीपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, प्रहार…

अधिक बातमी वाचा...

कष्टातून उभा राहिलेला यशाचा प्रवास; शेतकरी कुटुंबातील युवकाची प्रेरणादायी कहाणी

परंडा | माझं गांव माझं शहर एका छोट्या गावातील कष्टाळू शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकाने जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्याची प्रेरणादायी कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भगवान बाबूराव पवार हे चार एकर शेतीत मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पत्नी शालन यांच्यासह त्यांनी शेती आणि घराची जबाबदारी सांभाळत चार…

अधिक बातमी वाचा...

स्वामी समर्थ महाराज मंदिरातील महापंगतीसाठी किचनशेड बांधकामाचा शुभारंभ

माझं गांव माझं शहर | परंडा ता. २३ : शहरातील समर्थनगर परिसरातील स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे महापंगतीसाठी आवश्यक असणाऱ्या किचनशेड बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २२) उत्साहात करण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी व मंदिरातील धार्मिक कार्यक्रम अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने हे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!