माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी (दि.७ मे २०२६)
माहिती अधिकार महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष फारूक शेख हे शासकीय कामानिमित्त करमाळा येथे आले असता, करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करून सत्कार करण्यात आला.
करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष विशाल परदेशी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फारूक शेख यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतात, तसेच शासनाच्या विविध विभागांतील माहिती पारदर्शकपणे मिळविण्यासाठी या कायद्याचा उपयोग कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कायद्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
मार्गदर्शनानंतर तालुका शाखेच्या वतीने फारूक शेख यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास तालुका संघटक विशाल राठोड, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष आयूब शेख, पत्रकार आलिम शेख, सोहेल शेख, तात्या ओहाळ, ईजाज पटेल यांच्यासह महासंघाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
