महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पाडुळे बंधुंचा सत्कार..

माझं गांव माझं शहर, दि.०८ (परंडा) कौडगाव ता. परंडा येथील शेतकरी कुटुंबातील दोन सख्खे भाऊ एकत्र पोलिस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. अतिशय कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. या पाडुळे बंधुंनी ऊस तोड व वाहतूकीचे काम करत अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी श्री. महारुद्र दत्तात्रय पाडुळे आणि श्री. रत्नाकर महारुद्र पाडुळे या सख्ख्या भावांनी एकाच वेळी परिक्षा उत्तीर्ण होऊन दोघांनी मोठे यश संपादन केले. तसेच श्री. कृष्णा भरत ठवरे याचीही रत्नागिरी येथे पोलीस शिपाई म्हणून निवड झाली या यशाबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे या दोन्ही पाडुळे बंधुंचा व ठवरे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, कौडगावचे सरपंच तथा भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, भाजपा नेते जयदेव बप्पा गोफणे, श्रीमंत शेळके, ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, साहेबराव पाडुळे, श्रीकृष्ण शिंदे, पांडुरंग मुसळे, आप्पासाहेब मदने, संतोष भिसे, सागर ठवरे, प्रदीप पाडुळे, शिवाजी देवकर, अनिकेत कुलकर्णी, अमोल तरटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!