शिक्षण महर्षी रा. गे. शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Maharashtra Day निमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीताने झाली. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली.

यावेळी B. R. Ambedkar तसेच श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे संस्थापक कै. रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी आपल्या मनोगतात Shivaji Maharaj, B. R. Ambedkar, Jyotirao Phule आणि Shahu Maharaj यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. संत परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि महापुरुषांचे विचार हीच महाराष्ट्राची खरी ताकद असून देशासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कृष्णा परभणे यांनी केले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक डॉ. किरण देशमुख, कार्यालय अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्णा परभणे यांनी केले.

error: Content is protected !!