जवळा येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ; नाम फाउंडेशन व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : ता. ५ रोजी परंडा तालुक्यातील जवळा (नि.) येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ नाम फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा शुभारंभ माननीय तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज पाटील, मंडळ कृषी अधिकारी शामराव फरतडे यांची प्रमुख…

अधिक बातमी वाचा...

नसरापूर येथील अमानुष घटनेचा परंड्यात तीव्र निषेध; तहसीलदारांना निवेदन

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद परंडा तालुक्यात उमटले आहेत. या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी परंडा शहरातील ब्राह्मण समाज महिला तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केले. पुण्यातील…

अधिक बातमी वाचा...

पूरबाधित शाळांना सीमेन्स युनियन व ऐक्य ट्रस्टचा मदतीचा हात

माझं गाव माझं शहर | परंडा (दि. ४ मे) : परंडा तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीमेन्स वर्कर्स युनियन आणि सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट, ठाणे (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने सहा शाळांना लाखो रुपयांचे शालेय साहित्य व उपकरणांचे वाटप करण्यात आले. आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद…

अधिक बातमी वाचा...

नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नोंदणीने परंडा शहरातील जनगणना नोंदणीला शुभारंभ

📰 माझं गाव माझं शहर | परंडा, दि. २ मे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात स्व-जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून परंडा शहरात या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतः नोंदणी करून केला. १ मेपासून राज्यभर स्व-जनगणना मोहीम सुरू झाली आहे. दिवे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची जनगणना नोंदणी…

अधिक बातमी वाचा...

रुग्णसेवा हाच ईश्वर सेवा; आमदार तानाजीराव सावंत यांची माणुसकीची मदत..

📰 माझं गाव माझं शहर | परंडा “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या विचाराला साजेसं काम करत धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते तथा भुम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे. तालुक्यातील मौजे रोसा येथील रहिवासी सुधाकर गव्हाणे हे कर्करोगाने गंभीर आजारी असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पुढील…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात पाणीपुरवठा विस्कळीत; ‘लाईट नाही किंवा मोटर जळली’ या कारणांनी नागरिक हैराण .

परंडा (प्रतिनिधी):  कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच परंडा शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून (विशेषतः डिसेंबर २०२५ मधील निवडणुकांनंतर) शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यंत अनियमित झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.कर्मचाऱ्यांची तीच तीच कारणे:शहरातील पाणीपुरवठा का होत नाही, याबाबत जेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली जाते, तेव्हा “लाईट नव्हती”, “मोटर जळली आहे”…

अधिक बातमी वाचा...

शिक्षण महर्षी रा. गे. शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. Maharashtra Day निमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीताने झाली. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवू ; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

धाराशिव,दि.१ मे (माझं गांव माझं शहर) आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडविणे हीच प्रगतीची खरी दिशा आहे.नव्याने उभारलेल्या आरोग्य संस्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल,तर ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून प्रत्येक गाव निरोगी,सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा संकल्प शासनाने हाती घेतला आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज १ मे…

अधिक बातमी वाचा...

हायकोर्टाचा बावची येथील थिटे याला दणका

परंडा(प्रतिनिधी) ऑट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे यांचा उच्च न्यायालय खंडपीठ संभाजी नगर यांनी जामीन अर्ज फेटाळलापरंडा तालुक्यातील ऑट्रॉसिटी प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने दि. ७ एप्रिल रोजी फेटाळून लावला होतो सदरील आरोपी थिटे यांनी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजी नगर येथे…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात १४ जर्सी गायींची क्रूरतेने बेकायदेशीर वाहतूक उघड; आयशर ट्रकसह ११.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): कत्तलीच्या उद्देशाने कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता अत्यंत क्रूरपणे १४ जर्सी गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारा आयशर ट्रक परंडा पोलिसांनी पकडत मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई वांगी बु. (ता. परंडा) येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली असून, पोलिसांनी जनावरे आणि वाहनासह तब्बल ११ लाख २० हजार रुपयांचा…

अधिक बातमी वाचा...

सेवा निवृत्तीनिमित्त महानंदा कांबळे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न

परंडा ( दि.28) :- तालुक्यातील कुंभेजा येथील अंगणवाडी मदतनीस महानंदा धोंडीराम कांबळे या येत्या ३० एप्रिल रोजी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. यानिमित्त मंगळवारी ( दि. २८) सोनारी विभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करून निरोप देण्यात आला.सोनारी विभागाच्या अधीक्षिका करुणा गायकवाड यांनी महानंदा कांबळे यांचा साडी-चोळी, शाल, श्रीफळ, पुष्पहार…

अधिक बातमी वाचा...

पत्रकाराला दमदाटी व जातीय शिवीगाळ प्रकरणी कारवाईची मागणी

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : शहरातील एका पत्रकारास दमदाटी करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्याधिकारी नगर परिषद परंडा तसेच नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे गेल्या तीन ते…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!