दुःखाचा डोंगर कोसळला : नदीतील मोटरचा शॉक बसून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

परांडा | माझं गांव माझं शहर परांडा तालुक्यातील कपिलापुरी गावावर शुक्रवारी दुःखाचा डोंगर कोसळला. नदीतील विद्युत मोटर बाहेर काढत असताना विजेचा तीव्र शॉक बसून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिलापुरी येथील शेतकरी अनिल श्रीधर देवळकर (जैन) यांच्या शेतातील विद्युत…

अधिक बातमी वाचा...

जातेगाव परिसरात भीषण अपघात; सहा-सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

करमाळा माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी करमाळा-अहिल्यानगर मार्गावरील जातेगाव परिसरात रविवारी (दि.१७) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. शिर्डीहून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एर्टिगा कारची करमाळाहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्दैवी अपघातात सहा ते सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक…

अधिक बातमी वाचा...

जवळा येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ; नाम फाउंडेशन व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : ता. ५ रोजी परंडा तालुक्यातील जवळा (नि.) येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ नाम फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा शुभारंभ माननीय तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज पाटील, मंडळ कृषी अधिकारी शामराव फरतडे यांची प्रमुख…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भाजपा संपर्क कार्यालय येथे अभिवादन..

परंडा(माझं गांव माझं शहर) महाराष्ट्राच्या राजकारणातील धाडसी निर्णयक्षम नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस हार घालून भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे,…

अधिक बातमी वाचा...

तरुण पत्रकार आणि कलाकार हर्षद लोहार यांचे अल्पवयात निधन.

बार्शी(माझं गांव माझं शहर) बार्शीतील तरुण पत्रकार आणि हुरहुन्नरी कलाकार, व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांचे दि.२८ रोजी पहाटे निधन झाले. वयाच्या केवळ ३५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते मेंदूच्या आजाराशी झुंज देत होते. मात्र उपचार सुरू असतानाही आज पहाटे साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पत्रकारितेसोबतच कला…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!