परंडा शहरात पाणीपुरवठा विस्कळीत; ‘लाईट नाही किंवा मोटर जळली’ या कारणांनी नागरिक हैराण .

परंडा (प्रतिनिधी):  कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच परंडा शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून (विशेषतः डिसेंबर २०२५ मधील निवडणुकांनंतर) शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यंत अनियमित झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.कर्मचाऱ्यांची तीच तीच कारणे:शहरातील पाणीपुरवठा का होत नाही, याबाबत जेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली जाते, तेव्हा “लाईट नव्हती”, “मोटर जळली आहे” किंवा “पाईपलाईन फुटली आहे” अशी ठराविक उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा संतापजनक आरोप नागरिक करत आहेत.१५०० रुपये पाणीपट्टी भरूनही हाल:नगर परिषद वर्षाकाठी प्रत्येक घराकडून १५०० रुपये पाणीपट्टी वसूल करते. ही वसुली नियमित केली जात असताना, सुविधा पुरवताना मात्र टाळाटाळ का? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. उन्हाळ्यात पाण्याचे महत्त्व अधिक असताना प्रशासन मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.नागरिकांचे साकडे: आता कोणाकडे जायचे?प्रशासकीय उदासीनतेमुळे परंडावासीय हैराण झाले असून, पाण्यासाठी टँकरवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. “आम्ही दाद मागायची कोणाकडे?” असा संतप्त सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे.मुख्य अधिकाऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी:परंडा नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून पाण्याचा प्रश्न निकाली काढावा. कर्मचाऱ्यांच्या कामात शिस्त आणून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा सुरळीत करावे, अशी मागणी परंडा शहरातील नागरिकांनी केली आहे. जर पाणीपुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिक बोलले जात आहे .

error: Content is protected !!