जवळा येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ; नाम फाउंडेशन व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : ता. ५ रोजी परंडा तालुक्यातील जवळा (नि.) येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ नाम फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचा शुभारंभ माननीय तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज पाटील, मंडळ कृषी अधिकारी शामराव फरतडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमावेळी सहाय्यक कृषी अधिकारी संदीप यादव, कल्याण जाधव, महसूल अधिकारी खोसे तसेच जवळा येथील शेतकरी अमोल कुंडलिक, शाहू कातुरे, कुंडलिक कातुरे, आश्रू कातुरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ‘जलतारा’ उपक्रमामुळे परिसरातील जलसंधारणाला चालना मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!