रुग्णसेवा हाच ईश्वर सेवा; आमदार तानाजीराव सावंत यांची माणुसकीची मदत..

📰 माझं गाव माझं शहर | परंडा “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या विचाराला साजेसं काम करत धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते तथा भुम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

तालुक्यातील मौजे रोसा येथील रहिवासी सुधाकर गव्हाणे हे कर्करोगाने गंभीर आजारी असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पुढील उपचारासाठी आवश्यक निधी नसल्याने ते पूर्णपणे हतबल झाले होते. कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते अमोल नलवडे यांच्याकडे मदतीची याचना केली.

अमोल नलवडे यांनी ही बाब तत्काळ संबंधित पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक रामचंद्र घोगरे सर, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे, तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव तसेच माजी पशुसंवर्धन सभापती नवनाथ (आप्पा) जगताप यांनी आमदार सावंत यांच्याकडे मदतीची विनंती केली.

संपूर्ण परिस्थिती समजून घेत आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ ५० हजार रुपयांची रोख मदत जाहीर करून दिली. त्यांच्या या त्वरित मदतीमुळे गव्हाणे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, गटनेते अमोल नलवडे, नवनाथ (आप्पा) जगताप, दैनिक जनमतचे प्रतिनिधी भजनदास (बप्पा) गुडे, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख शहाजी ढोरे पाटील तसेच रोसा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!