सेवा निवृत्तीनिमित्त महानंदा कांबळे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न


परंडा ( दि.28) :- तालुक्यातील कुंभेजा येथील अंगणवाडी मदतनीस महानंदा धोंडीराम कांबळे या येत्या ३० एप्रिल रोजी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. यानिमित्त मंगळवारी ( दि. २८) सोनारी विभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करून निरोप देण्यात आला.
सोनारी विभागाच्या अधीक्षिका करुणा गायकवाड यांनी महानंदा कांबळे यांचा साडी-चोळी, शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. यावेळी सोनारी विभागातील ३० अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावतीने कांबळे यांना भेट वस्तू देण्यात आली.
यावेळी अधीक्षिका करुणा गायकवाड यांच्यासह कुंभेजा येथील सेविका सिंधुबाई सुनील कांबळे, सेविका मीनाक्षी काळे, श्वेता हजारे,रेखा सरडे, प्रतीक्षा सूर्यवंशी, उषा चौधरी, सुमन सोनवणे यांच्यासह सोनारी विभागातील 30 अंगणवाडी सेविका, मदतनीस, महानंदा कांबळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

error: Content is protected !!