अस्थी विसर्जनाऐवजी आंब्याचे झाड लावून तांबे बंधूंचा आदर्श उपक्रम
परंडा प्रतिनिधी : मृत्यूनंतर अस्थी पाण्यात विसर्जित करण्याची पारंपरिक प्रथा बाजूला ठेवत परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कै. महादेव बळीराम तांबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी अस्थी विसर्जन न करता शेतात पुरून त्यावर केशर जातीच्या आंब्याचे रोप लावले. या अभिनव निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. कै. महादेव…
चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंद
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला अखेर यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर खुर्द येथील खून प्रकरणाची नोंद 10 जून 2026 रोजी आंबी पोलीस ठाण्यात…
भोत्रा येथे हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन; पाच कोयते जप्त, एकाविरुद्ध गुन्हा
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भोत्रा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या घरझडतीदरम्यान पाच धारदार कोयते आणि तीन संशयित मोबाईल हस्तगत केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार भुजंग सुखदेव आडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल जेजेराम सल्ले (वय 40, रा….
परंडा येथे डिजिटल मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
परंडा |प्रतिनिधी परांडा येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया संघटना परांडाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या सोशल मीडिया विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डिजिटल माध्यमांद्वारे जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली. बैठकीत नूरजहाँ शेख यांची सोशल मीडिया अध्यक्षा, संतोष शिंदे यांची उपाध्यक्ष तर…
ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई काशीद यांचे निधन; परंडा शहरात हळहळ
परंडा प्रतिनिधी : परंडा शहरातील काशीद गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई दगडू काशीद यांचे गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर बावची रोड येथील स्मशानभूमीत दुपारी १ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध…
परंड्यात पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
परंडा (प्रतिनिधी)- पत्नीला सोशल मीडियावर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा जाब विचारल्यावरून एका तरुणाला पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पीडित तरुण आणि पोलीस कर्मचारी अशा दोन स्वतंत्र व्यक्तींच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली फिर्याद पीडित तक्रार तरुणाची विकास सुनील जगताप वय 29 यांच्या फिर्यादीनुसार,…
उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना शिबीर उत्साहात संपन्न
परंडा | प्रतिनिधी माझं गाव माझं शहर उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना अंतर्गत आयोजित मासिक आरोग्य शिबीर मंगळवारी (दि. ९ जून २०२६) उत्साहपूर्ण व जनहितकारी वातावरणात संपन्न झाले. गर्भवती माता भगिनींच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर महिन्याच्या ९ तारखेला हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतो. तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोग…
डॉ. दीपक ओव्हाळ यांना पीएचडी पदवी प्राप्त; रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कार
परंडा प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. दीपक ओव्हाळ यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते डॉ. ओव्हाळ यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संजय…
८ तोळे पैकी ५.५ तोळे सोने हस्तगत, पांगरी पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस..
बार्शी/माझं गांव माझं शहर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीला पांगरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या ८ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या मालापैकी ५.५ सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,…
परंडा तालुक्यातील वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घ्या; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदन
परंडा, दि. ९ जून: परंडा तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, धाराशिव जिल्हाधिकारी, महावितरणचे मुख्य अभियंता (लातूर परिमंडळ), उपकार्यकारी अभियंता (परंडा) तसेच तहसीलदार परंडा यांना…
कुंभेफळ येथील दलित वस्तीच्या विकास निधीवर डल्ला? चौकशीचे आदेश
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी एस. ए. कोटे यांना दिले आहेत. तक्रारीनुसार, कुंभेफळ गावातील किशोर गायकवाड…
सिझेरियन करण्यास विलंब, प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीन असलेल्या स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरू करत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी…

