दिव्यांग बांधवांसाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन;दिव्यांग सेवक तानाजी घोडके

प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांनी संधीचा लाभ घ्यावा : आयोजकांचे आवाहन

माझं गांव माझं शहर | परंडा

परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच ज्यांच्याकडे अद्याप अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून शनिवार, दि. २३ मे रोजी परंडा येथील सरकारी दवाखान्यात पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिव्यांगांची तपासणी करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिव्यांग उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अनेक दिव्यांग नागरिकांकडे अद्याप अधिकृत प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय सुविधा, पेन्शन योजना, शैक्षणिक सवलती तसेच इतर लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन परंडा येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरासाठी येताना आधार कार्ड, फोटो, जुने वैद्यकीय कागदपत्रे तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

तसेच परंडा तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिरात उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी आणि प्रमाणपत्र मिळवून शासन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!