डॉ. दीपक ओव्हाळ यांना पीएचडी पदवी प्राप्त; रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कार

परंडा प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. दीपक ओव्हाळ यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते डॉ. ओव्हाळ यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संजय कुमार बनसोडे यांनी डॉ. ओव्हाळ यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या सत्कार समारंभास रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सर्वदे, माजी तालुकाध्यक्ष फकीरदादा सुरवसे, प्रा. रणदिल सर, प्रा. डॉ. चंदनशिवे सर, प्रा. धनवे सर, प्रा. सरवदे सर, अनिल जानराव सर, हरीभाऊ आडाळे, संजीवन भोसले, भारत देंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी डॉ. दीपक ओव्हाळ यांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रातील ही उपलब्धी युवकांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!