भोत्रा येथे हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन; पाच कोयते जप्त, एकाविरुद्ध गुन्हा

परंडा | प्रतिनिधी

परंडा तालुक्यातील भोत्रा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या घरझडतीदरम्यान पाच धारदार कोयते आणि तीन संशयित मोबाईल हस्तगत केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार भुजंग सुखदेव आडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल जेजेराम सल्ले (वय 40, रा. भोत्रा, ता. परंडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशानंतरही आरोपीच्या ताब्यात विविध आकाराचे पाच धारदार लोखंडी कोयते आढळून आले. याशिवाय एक सॅमसंग टॅब, एक विवो मोबाईल आणि एक सॅमसंग मोबाईल असा एकूण सुमारे 5 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 306/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 112, 117 आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली मपोहेकॉं/1004 तांबोळी यांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोहेकॉं/1441 गायकवाड करीत आहेत. हा गुन्हा 12 जून 2026 रोजी सकाळी 7.37 वाजता दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

error: Content is protected !!