येरमाळ्यात एलसीबीची धडक कारवाई; ६२ लाखांचा अवैध गुटखा जप्त

माझं गांव माझं शहर | धाराशिव येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरातील वडजी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार रुपयांचा अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे इतर साथीदार पसार झाले आहेत. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे….

अधिक बातमी वाचा...

रिटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. केशराबाई रिटे यांची निवड

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. केशराबाई बापू रिटे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकसेवेच्या उद्देशाने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी करमाळा तालुक्याचे युवा नेतृत्व, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय…

अधिक बातमी वाचा...

साकत तलाव परिसरातून तरुण बेपत्ता; परंडा तालुक्यात खळबळ

माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी परंडा तालुक्यातील रोहकल येथील कृष्णा सतिष शिंदे (वय २६) हा तरुण साकत तलाव परिसरातून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रमेश सतिष शिंदे यांच्या जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक २६/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री…

अधिक बातमी वाचा...

नीटमुळे ‘ MAHA TET महाटीईटी २०२६’ परीक्षा पुढे ढकलली

माझं गांव माझं शहर,पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) २१ जून रोजी होणार असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६’ (महाटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता राज्यात ही परीक्षा २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे यापूर्वी महाटीईटी परीक्षा…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर शहरातील पार्किंगच्या नावाने होणारी अतिरिक्त वसुली तात्काळ बंद;संबंधितांवर चौकशीची मागणी

तुळजापूर (माझं गांव माझं शहर ) : तुळजापूर शहरात श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली अतिरिक्त वसुली अखेर प्रशासनाने बंद केली असून, शिवसेना पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या प्रश्नावर शिवसेना शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देत भाविकांची आर्थिक लूट थांबविण्याची…

अधिक बातमी वाचा...

टेंभुर्णी पोलिसांनी नियमबाह्य आणि कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर मोठी कारवाई करत ८३१ केसेसमधून ७.५० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

माढा(माझं गांव माझं शहर ) टेंभुर्णी शहरात बुलेट मोटारसायकलींना कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात टेंभुर्णी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्रभारी अधिकारी तथा परी सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 37 बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली असून, 11 बुलेटचे अवैध सायलेन्सर फोडून नष्ट करण्यात आले.नागरिकांकडून मोठ्या…

अधिक बातमी वाचा...

सोलापूर : पीक विमा, वंचित शेतकऱ्यांची भरपाई आणि सीना नदीत पाणी सोडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे जोरदार मागणी

सोलापूर, दि. १३ मे : प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. पीक विमा नुकसान भरपाई, खरीप २०२३ मधील वंचित शेतकऱ्यांना विमा रक्कम आणि सीना नदीत भीमा कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली….

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलकडून जनगणना कामाची जय्यत तयारी; साहित्य वाटपास सुरुवात

माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी परंडा तहसील कार्यालयामार्फत २०२७ च्या जनगणना प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून जनगणना कामासाठी आवश्यक साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) साहित्य वितरण करण्यात आले. देशातील १६ वी भारतीय जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार असून प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ‘घरांची यादी…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेची मोठी कारवाई; कडक पोलीस बंदोबस्तात किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे भुईसपाट

माझं गांव माझं शहर | ऐतिहासिक परंडा किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर आज परंडा नगरपरिषदेने मोठी धडक कारवाई करत संपूर्ण रस्ता मोकळा केला. कडक पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून वाहतुकीस अडथळा ठरत असलेला मार्ग अखेर खुला झाला आहे. परंडा किल्ला हा जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने दररोज मोठ्या संख्येने पर्यटक…

अधिक बातमी वाचा...

सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या नवीन नियुक्त्या जाहीर ; परंडा तालुका अध्यक्षपदी सुरेश श्रीहरी बागडे यांची निवड

परंडा (माझं गांव माझं शहर) सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या प्रदेशाध्यक्ष उमेश बोराडे यांच्या आदेशानुसार व धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, सुवर्णकार समाजाच्या व्यावसायिक व कायदेशीर प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि समाज बांधवांना संघटित करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे…

अधिक बातमी वाचा...

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा महाघोटाळा उघड ; “माफी मागा, अन्यथा सक्तीने निवृत्त व्हा!” — उच्च न्यायालयाचा राज्य प्रशासनाला दणका

राज्यातील शासकीय यंत्रणेला हादरवून सोडणारा बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अनेक वर्षे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या, पदोन्नती, आरक्षण आणि विविध शासकीय लाभ घेतल्याचा संशय असलेल्या कर्मचाऱ्यांवर आता थेट कारवाईचे संकेत मिळाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे प्रशासन, आरोग्य विभाग आणि कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारला…

अधिक बातमी वाचा...

भाजपच्या SIR कार्यशाळांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;संघटनात्मक बांधणी व बूथ सक्षमीकरणावर भर

धाराशिव | माझं गांव माझं शहर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निहाय SIR कार्यशाळा तसेच कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांमधून संघटनात्मक बांधणी, बूथ सक्षमीकरण, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. भूम-परंडा-वाशी तसेच धाराशिव विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!