नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नोंदणीने परंडा शहरातील जनगणना नोंदणीला शुभारंभ

📰 माझं गाव माझं शहर | परंडा, दि. २ मे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात स्व-जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून परंडा शहरात या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतः नोंदणी करून केला. १ मेपासून राज्यभर स्व-जनगणना मोहीम सुरू झाली आहे. दिवे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची जनगणना नोंदणी…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात पाणीपुरवठा विस्कळीत; ‘लाईट नाही किंवा मोटर जळली’ या कारणांनी नागरिक हैराण .

परंडा (प्रतिनिधी):  कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच परंडा शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून (विशेषतः डिसेंबर २०२५ मधील निवडणुकांनंतर) शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यंत अनियमित झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.कर्मचाऱ्यांची तीच तीच कारणे:शहरातील पाणीपुरवठा का होत नाही, याबाबत जेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली जाते, तेव्हा “लाईट नव्हती”, “मोटर जळली आहे”…

अधिक बातमी वाचा...

शिक्षण महर्षी रा. गे. शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. Maharashtra Day निमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीताने झाली. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

परंड्यात १४ जर्सी गायींची क्रूरतेने बेकायदेशीर वाहतूक उघड; आयशर ट्रकसह ११.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): कत्तलीच्या उद्देशाने कोणतीही चारा-पाण्याची व्यवस्था न करता अत्यंत क्रूरपणे १४ जर्सी गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारा आयशर ट्रक परंडा पोलिसांनी पकडत मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई वांगी बु. (ता. परंडा) येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली असून, पोलिसांनी जनावरे आणि वाहनासह तब्बल ११ लाख २० हजार रुपयांचा…

अधिक बातमी वाचा...

पत्रकाराला दमदाटी व जातीय शिवीगाळ प्रकरणी कारवाईची मागणी

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : शहरातील एका पत्रकारास दमदाटी करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्याधिकारी नगर परिषद परंडा तसेच नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे गेल्या तीन ते…

अधिक बातमी वाचा...

कुंभेजा येथे माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद

📰 माझं गाव माझं शहर |परंडा तालुक्यातील मौजे कुंभेजा येथे माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीचा पर्दाफाश करत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत सर्व आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. घटनेचा थरारक तपशील दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुंभेजा…

अधिक बातमी वाचा...

अवकाळी पावसाचा कहर : सिरसाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील सिरसाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पपई, पेरू, मका, केळी, आंबा तसेच इतर फळबागा आणि उभी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी…

अधिक बातमी वाचा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भाजपाची अनोखी मानवंदना!परंडा येथे अवतरली शिंदेशाही!

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रख्यात कवी गायक श्री. आनंद शिंदे यांचा शिंदेशाही गाण्याचा कार्यक्रम युवा नेते श्री. मल्हार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. या भीम गीतांचा भव्य…

अधिक बातमी वाचा...

३५३ गुन्ह्याची धमकी? उपजिल्हा रुग्णालयातील प्रकारावर नागरिकामध्ये संताप

📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी): तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत गंभीर तक्रार समोर आली असून, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात इसुब अमीन पठाण यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे. सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असून, वेळेवर योग्य उपचार…

अधिक बातमी वाचा...

परंडा पंचायत समितीचा कारभार ‘रामभरोसे’; तक्रारी प्रलंबितच, नागरिक संतप्त

माझं गाव माझं शहर |प्रतिनिधी : तानाजी घोडके परंडा पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ढासळल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांनी केलेल्या तक्रारी धूळ खात पडल्या असून, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुहूर्त…

अधिक बातमी वाचा...

भीम जयंती महोत्सवात परंडा नगरीत भीमगीतांचा दणदणाट!

माझं गांव माझं शहर | परंडा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परंडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या भीम जयंती महोत्सवात भीमगीतांचा दणदणाट होत, संपूर्ण शहर भीममय झाले. शिंदेशाहीचा गजर आणि भव्य महासंगीत सोहळ्यामुळे वातावरण उत्साहाने भारावून गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करत उपस्थित मान्यवरांनी सर्वांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील…

अधिक बातमी वाचा...

डोंजा–देऊळगाव रस्त्याची दुरावस्था; ठेकेदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ संतप्त

माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील डोंजा–देऊळगाव या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकताच पूर्ण झालेला हा रस्ता अल्पावधीतच खराब झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुख्य मुद्दे : डोंजा–देऊळगाव रस्ता हा स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असून त्याची झालेली दुरावस्था ही…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!