साकत तलाव परिसरातून तरुण बेपत्ता; परंडा तालुक्यात खळबळ

माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी

परंडा तालुक्यातील रोहकल येथील कृष्णा सतिष शिंदे (वय २६) हा तरुण साकत तलाव परिसरातून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रमेश सतिष शिंदे यांच्या जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक २६/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रमेश शिंदे यांना गावातील तेजस काटकर याने फोन करून माहिती दिली की, साकत तलावावर महारुद्र जाधव, राम जाधव, गणेश जाधव व अनिरुद्र जाधव यांनी कृष्णा शिंदे यास काठीने मारहाण केली असून त्यामध्ये त्याचा पाय मोडला आहे. तसेच मारहाणीच्या भीतीने कृष्णाने साकत तलावाच्या पाण्यात उडी मारल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच रमेश शिंदे यांनी पुणे येथून तातडीने साकत तलाव परिसर गाठला. तलावाजवळ कृष्णाची पांढऱ्या रंगाची चेतक स्कूटी तसेच त्याच्या पायातील चप्पल आढळून आली. त्याचा मोबाईल फोन तलावाच्या चारीवर पडलेला त्याचा मित्र तेजस याला सापडला.

यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी तलाव परिसरासह विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. मात्र कृष्णा शिंदे याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

बेपत्ता तरुणाचे वर्णन

  • नाव : कृष्णा सतिष शिंदे
  • वय : २६ वर्ष
  • रा. रोहकल, ता. परंडा
  • रंग : सावळा
  • उंची : ५ फूट ३ इंच
  • चेहरा : उभट
  • नाक : सरळ

विशेष खूण : उजव्या हाताच्या पोटरीवर महादेवाचे चित्र, त्रिशूळ व ‘सोन्या भाऊ’ असे गोंदलेले आहे.

अंगातील कपडे : पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट.

सदर बेपत्ता व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास परंडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक

  • पोलीस निरीक्षक श्री. चोरमले साहेब, पोलीस ठाणे परंडा
  • पोलीस ठाणे परंडा : ९८३४४८५६२९
  • सपोफौ गजानन मुळे : ९६५७८१६९८४
  • पोहेकॉ एस. बी. राऊत : ९८२२६५६२०४

या प्रकरणाचा अधिक तपास सपोफौ गजानन मुळे हे करीत आहेत.

error: Content is protected !!