भाजपच्या SIR कार्यशाळांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;संघटनात्मक बांधणी व बूथ सक्षमीकरणावर भर

धाराशिव | माझं गांव माझं शहर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निहाय SIR कार्यशाळा तसेच कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांमधून संघटनात्मक बांधणी, बूथ सक्षमीकरण, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

भूम-परंडा-वाशी तसेच धाराशिव विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय जनता पार्टीची विचारधारा प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला.

या कार्यशाळांमधून पक्ष कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षाच्या योजनांचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, नितीन काळे, अनिल काळे, नितीन भोसले, गणेश खरसडे, प्रदीप शिंदे यांच्यासह पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या संवाद आणि मार्गदर्शनातून आगामी काळात अधिक जोमाने पक्ष कार्य करण्याची ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!