नगर परिषद कर्मचाऱ्याच्या निषेधार्थ परंडा शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची मागणी
परंडा (प्रतिनिधी): परंडा नगर परिषद कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे यांनी मुस्लिम समाजाबाबत जातीवाचक अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ९ मे) परंडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची व कठोर कारवाईची मागणी समस्त मुस्लिम समाज व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, महाराष्ट्र नागरी सेवा…
