कुंभेजा येथे कॅनल पट्टीवरील वस्तीवर दरोडा; एक जखमी, मुद्देमाल लंपास

📰 माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील कुंभेजा परिसरात कॅनल पट्टीवर राहणाऱ्या वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला करून दहशत निर्माण केल्याची घटना दि.२५ रोजी रात्री घडली हे समोर आली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी घरांवर दरड टाकत मुद्देमाल व रोख रक्कम सहजरीत्या चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आले असून तो…

अधिक बातमी वाचा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भाजपाची अनोखी मानवंदना!परंडा येथे अवतरली शिंदेशाही!

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रख्यात कवी गायक श्री. आनंद शिंदे यांचा शिंदेशाही गाण्याचा कार्यक्रम युवा नेते श्री. मल्हार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. या भीम गीतांचा भव्य…

अधिक बातमी वाचा...

परंडा पंचायत समितीचा कारभार ‘रामभरोसे’; तक्रारी प्रलंबितच, नागरिक संतप्त

माझं गाव माझं शहर |प्रतिनिधी : तानाजी घोडके परंडा पंचायत समितीतील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ढासळल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांनी केलेल्या तक्रारी धूळ खात पडल्या असून, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुहूर्त…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलदारांवरील हल्ला प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करामहाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माझं गांव माझं शहर , धाराशिव : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, तसेच महसूलमंत्री यांना सोमवार (दि. 20 एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तहसीलदार निलेश…

अधिक बातमी वाचा...

भीम जयंती महोत्सवात परंडा नगरीत भीमगीतांचा दणदणाट!

माझं गांव माझं शहर | परंडा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परंडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या भीम जयंती महोत्सवात भीमगीतांचा दणदणाट होत, संपूर्ण शहर भीममय झाले. शिंदेशाहीचा गजर आणि भव्य महासंगीत सोहळ्यामुळे वातावरण उत्साहाने भारावून गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करत उपस्थित मान्यवरांनी सर्वांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील…

अधिक बातमी वाचा...

परंडा उपजिल्हा रुग्णालयातील २१ कर्मचारी संपावर; आरोग्य यंत्रणा ‘सलाईनवर’!

माझं गाव माझं शहर | परंडा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील तब्बल २१ कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरशः ‘सलाईनवर’ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माहितीनुसार, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी…

अधिक बातमी वाचा...

परंडा पंचायत समितीत धक्कादायक प्रकार! तक्रारदाराला बीडीओसमोरच मारहाण; उलट तक्रारदारावर गुन्हा

परंडा (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील परंडा पंचायत समिती कार्यालयात तक्रारदाराला अधिकाऱ्यांच्या दालनातच मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील कंडारी येथील आंबादास वाघमारे यांनी पंचायत समितीतील काही तक्रारी संदर्भात पाठपुरावा सुरू केला होता. याच अनुषंगाने ते १५ एप्रिल रोजी…

अधिक बातमी वाचा...

डोंजा–देऊळगाव रस्त्याची दुरावस्था; ठेकेदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ संतप्त

माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील डोंजा–देऊळगाव या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकताच पूर्ण झालेला हा रस्ता अल्पावधीतच खराब झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुख्य मुद्दे : डोंजा–देऊळगाव रस्ता हा स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असून त्याची झालेली दुरावस्था ही…

अधिक बातमी वाचा...

⚡ परंडा शहरात महावितरणचा ‘शॉक’; भर उन्हाळ्यात तासनतास वीज गुल

माझं गाव माझं शहर |परंडा शहरात भर उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तापमान चाळीशी पार गेले असताना दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 🔴 मुख्य समस्या (मुद्देनिहाय) 🧊 नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल 💸 “सेवा नाही, फक्त वसुली?” – नागरिकांचा…

अधिक बातमी वाचा...

तक्रारदार विरोधात कारवाईसाठी कर्मचाऱ्यांनी जनतेला धरले वेठीस; तहसील कार्यालयातील वादग्रस्त घटना

माझं गाव माझं शहर |परंडा, दि. २० (प्रतिनिधी) — परंडा तहसील कार्यालयात तक्रारदार आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे दोन दिवस कामकाज ठप्प राहून सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. 📌 घटनेचा सविस्तर आढावा (मुद्देनिहाय) कर्मचाऱ्यांचे आंदोलन नागरिकांची नाराजी 🔍 अवैध वाळू उपसा…

अधिक बातमी वाचा...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

परंडा, माझं गांव माझं शहर (दि :१४ एप्रिल) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.१४ एप्रिल रोजी पहाटे १२:०५ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के तसेच फुले-आंबेडकर विद्वतसभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, सोमवारी बेमुदत सामूहिक रजेचा इशारा .

परंडा (प्रतिनिधी) : अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी जात असताना परंडा येथील तहसीलदार यांच्यावर कार्यालयाच्या आवारातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कडक कारवाईच्या मागणीसाठी परंडा तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि. १६) दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, १५…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!