दै.माझं गांव माझं शहर

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले दै.माझं गांव माझं शहर, ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी! राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षांचा करमाळ्यात सत्कार; कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी (दि.७ मे २०२६) माहिती अधिकार महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष फारूक शेख हे शासकीय कामानिमित्त करमाळा येथे आले असता, करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करून सत्कार करण्यात आला. करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष विशाल परदेशी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फारूक शेख…

अधिक बातमी वाचा...

उद्या दहावीचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

माझं गांव माझं शहर | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. ०८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी व पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवमध्ये आत्मदहन प्रकरणातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

माझं गाव माझं शहर-परंडा | धाराशिव प्रतिनिधी धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना संबंधित महिलेने स्वतःवर…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे निर्णय; कर्ज मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

माझं गाव माझं शहर | प्रतिनिधी  मुंबई : दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कर्ज मर्यादा वाढविण्यासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर निर्देश देण्यात आले. बैठकीत दिव्यांगांसाठी सध्याची वैयक्तिक कर्ज मर्यादा केवळ ५० हजार रुपये असल्याचे नमूद करत ती अपुरी असल्याची…

अधिक बातमी वाचा...

कुंभेफळ येथे शेत रस्त्याचा प्रश्न ८ वर्षांपासून प्रलंबित; शेतकऱ्याचे महसूल मंत्र्यांना साकडे

परंडा प्रतिनिधी : तानाजी घोडके || परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील शेतकरी सिद्दिक उस्मान शेख यांचा शेत रस्त्याचा प्रश्न गेल्या तब्बल आठ वर्षांपासून प्रलंबित असून, न्यायासाठी त्यांनी थेट राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे पत्राद्वारे धाव घेतली आहे. “आठ-नऊ वर्षे होऊनही निकाल लागत नसेल, तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 📌 प्रकरणाची पार्श्वभूमी…

अधिक बातमी वाचा...

ऑट्रॉसिटी प्रकरणात बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे अखेर ४० दिवसांनी अटकेत; जिल्हा कारागृहात रवानगी

माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील गाजलेल्या ऑट्रॉसिटी प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली असून, बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याला तब्बल ४० दिवसांनी अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांसमोर मुदेमालासह शरण आल्यानंतर न्यायालयाने त्याला धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणात आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज…

अधिक बातमी वाचा...

चिंचपूर (बु) येथे दिव्यांग कुटुंबावर हल्ला; आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी

📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे अशोक भराडे दिव्यांग कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिकांकडून जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद…

अधिक बातमी वाचा...

जवळा येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ; नाम फाउंडेशन व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : ता. ५ रोजी परंडा तालुक्यातील जवळा (नि.) येथे ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ नाम फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा शुभारंभ माननीय तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज पाटील, मंडळ कृषी अधिकारी शामराव फरतडे यांची प्रमुख…

अधिक बातमी वाचा...

नसरापूर येथील अमानुष घटनेचा परंड्यात तीव्र निषेध; तहसीलदारांना निवेदन

📰 माझं गाव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद परंडा तालुक्यात उमटले आहेत. या अमानुष घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी परंडा शहरातील ब्राह्मण समाज महिला तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केले. पुण्यातील…

अधिक बातमी वाचा...

पूरबाधित शाळांना सीमेन्स युनियन व ऐक्य ट्रस्टचा मदतीचा हात

माझं गाव माझं शहर | परंडा (दि. ४ मे) : परंडा तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीमेन्स वर्कर्स युनियन आणि सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट, ठाणे (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने सहा शाळांना लाखो रुपयांचे शालेय साहित्य व उपकरणांचे वाटप करण्यात आले. आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद…

अधिक बातमी वाचा...

नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नोंदणीने परंडा शहरातील जनगणना नोंदणीला शुभारंभ

📰 माझं गाव माझं शहर | परंडा, दि. २ मे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात स्व-जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाली असून परंडा शहरात या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतः नोंदणी करून केला. १ मेपासून राज्यभर स्व-जनगणना मोहीम सुरू झाली आहे. दिवे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची जनगणना नोंदणी…

अधिक बातमी वाचा...

रुग्णसेवा हाच ईश्वर सेवा; आमदार तानाजीराव सावंत यांची माणुसकीची मदत..

📰 माझं गाव माझं शहर | परंडा “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या विचाराला साजेसं काम करत धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते तथा भुम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे. तालुक्यातील मौजे रोसा येथील रहिवासी सुधाकर गव्हाणे हे कर्करोगाने गंभीर आजारी असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पुढील…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!