बार्शीत थरारक घटना : पत्नीवर चाकूचे तब्बल ५० वार करून पतीकडून निर्घृण हत्या

प्रेमविवाहानंतर सततच्या वादातून घडली धक्कादायक घटना; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर माझं गांव माझं शहर | बार्शी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि.२५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बार्शी शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेचे नाव धनश्री पाटील असे असून, आरोपी पतीचे…

अधिक बातमी वाचा...

कायद्याचा भंग करणाऱ्या लवंगी मिरची कला केंद्रावर धाड ५०,१३,००० चे साहित्य जप्त..

बार्शी, माझं गांव माझं शहर : मा. पोलीस अधिक्षक सो यांचे आदेशाप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलींग, नाकाबंदी करून अवैध इसमांवर कारवाई करणेची धडक मोहीम चालू आहे. दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १:३० वा. चे सुमारास बार्शी ते…

अधिक बातमी वाचा...

स्वामी समर्थ महाराज मंदिरातील महापंगतीसाठी किचनशेड बांधकामाचा शुभारंभ

माझं गांव माझं शहर | परंडा ता. २३ : शहरातील समर्थनगर परिसरातील स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे महापंगतीसाठी आवश्यक असणाऱ्या किचनशेड बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २२) उत्साहात करण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी व मंदिरातील धार्मिक कार्यक्रम अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने हे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या…

अधिक बातमी वाचा...

गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री संत ज्ञानेश्वर प्रशालेत सत्कार

परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशी प्रशाला येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग बांधवांसाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन;दिव्यांग सेवक तानाजी घोडके

प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांनी संधीचा लाभ घ्यावा : आयोजकांचे आवाहन माझं गांव माझं शहर | परंडा परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच ज्यांच्याकडे अद्याप अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित…

अधिक बातमी वाचा...

बार्शीत आयपीएस अंजना कृष्णा यांचा ‘खौफ’; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले !

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) बार्शी शहर आणि तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून फोफावलेल्या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासन आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहे. तडफदार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अवैध व्यवसायिकांची झोप उडाली असून, शहरात “वातावरण कडक आहे!” ही एकच चर्चा सध्या रंगत आहे. अशोक सायकर…

अधिक बातमी वाचा...

तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे घवघवीत यश; १४ विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदांवर निवड

धाराशिव माझं गांव माझं शहर| प्रतिनिधी डॉ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राच्या माध्यमातून सन २०२६ मध्ये तब्बल १४ विद्यार्थ्यांनी विविध शासकीय पदांवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील होतकरू व जिद्दी विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आदरणीय डॉ….

अधिक बातमी वाचा...

जातेगाव परिसरात भीषण अपघात; सहा-सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

करमाळा माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी करमाळा-अहिल्यानगर मार्गावरील जातेगाव परिसरात रविवारी (दि.१७) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. शिर्डीहून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एर्टिगा कारची करमाळाहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्दैवी अपघातात सहा ते सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक…

अधिक बातमी वाचा...

पत्रकारांच्या संरक्षणासाठी संदीप काळे यांचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राहुल गांधी यांना पत्र

“व्हॉइस ऑफ मीडिया”कडून पत्रकार संरक्षण कायदा, विमा योजना आणि मीडिया स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी माझं गांव माझं शहर, मुंबई : देशातील पत्रकार आणि पत्रकारितेच्या गंभीर प्रश्नांवर आता राष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्यात येत असून, “व्हॉइस ऑफ मीडिया”, “व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम”चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,आणि…

अधिक बातमी वाचा...

रिटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. केशराबाई रिटे यांची निवड

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. केशराबाई बापू रिटे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकसेवेच्या उद्देशाने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी करमाळा तालुक्याचे युवा नेतृत्व, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय…

अधिक बातमी वाचा...

वैश्विक ओळखपत्रासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ;अनुदान सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश : मंत्री अतुल सावे

दै. माझं गांव माझं शहर मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या, मात्र अद्याप वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांना यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिल्याची माहिती Atul Save यांनी…

अधिक बातमी वाचा...

चिंचपूर (बु) येथे दिव्यांग कुटुंबावर हल्ला; आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी

📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे अशोक भराडे दिव्यांग कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिकांकडून जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!