माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) बार्शी शहर आणि तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून फोफावलेल्या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासन आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहे. तडफदार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे बार्शी उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अवैध व्यवसायिकांची झोप उडाली असून, शहरात “वातावरण कडक आहे!” ही एकच चर्चा सध्या रंगत आहे.
अशोक सायकर यांच्यानंतर कृष्णा यांच्याकडे सूत्रे
बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते. प्रशासनाने ही जबाबदारी करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे सोपवली. आपल्या धाडसी आणि कर्तव्यतत्पर कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अंजना कृष्णा यांनी पदभार स्वीकारताच धडाकेबाज कारवाई.
