डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भाजपाची अनोखी मानवंदना!परंडा येथे अवतरली शिंदेशाही!

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रख्यात कवी गायक श्री. आनंद शिंदे यांचा शिंदेशाही गाण्याचा कार्यक्रम युवा नेते श्री. मल्हार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. या भीम गीतांचा भव्य महासंगीत सोहळा यामुळे वातावरण भारावून गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब आणि युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

गायक आनंद शिंदे यांच्या सुरेल गायनाने भीमगीतांचा जल्लोष शिगेला पोहोचला. जोश, उत्साह आणि अभिमानाने भरलेला हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर जयभीमच्या घोषणांनी दुमदुमला आणि प्रत्येक हृदयात अभिमानाची ज्योत पेटली..!

याप्रसंगी भाजपा नेते मा. श्री. सुजितसिंहजी ठाकूरसाहेब, युवा नेते श्री. मल्हारदादा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्री. धनंजयदादा सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे, समाज कल्याण सभापती श्री. विश्वास कोकणे, उपनगराध्यक्ष श्री. समरजीतसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, भाजपा नेते श्री. गौतम लटके, श्री . जयदेव गोफणे, शहराध्यक्ष श्री. उमाकांत गोरे, जिल्हा परिषद सदस्य श्री. रेवन ढोरे, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, नगरसेवक श्री. राहुल बनसोडे, ॲड. जहीर चौधरी, श्री. तानाजी पाटील, श्री. धनाजी गायकवाड महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रियंकाताई क्षीरसागर, शहराध्यक्ष ज्योतीताई भातलवंडे, शुभदाताई शेलार उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. दिपक गायकवाड, श्री. निशिकांत क्षिरसागर, धनंजय काळे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील, मनोहर पवार, अमर ठाकूर, रामदास गुडे, रामकृष्ण घोडके, सिध्दीक हन्नुरे, सुरज काळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महायुतीचे जि.प., पं.स. सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!