धाराशिव येथे इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
धाराशिव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशपांडे स्टँड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. वाढत्या इंधन दरांमुळे महागाई वाढून शेतकरी, महिला, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप काँग्रेसने…
