जिल्हा परिषदेत मोठा प्रशासकीय भूकंपकलाकार मानधन योजनेतील गंभीर अनियमितता; पंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

विशेष प्रतिनिधी | धाराशिव धाराशिव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन सन्मान योजनेतील अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता, नियमबाह्य कामकाज, बनावट त्रुटी पूर्तता प्रस्ताव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणात पंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक एन. बी. राऊत यांना अखेर निलंबित करण्यात आले असून, जिल्हा…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे मार्गदर्शन चर्चासत्र उत्साहात.

पूरग्रस्त केमिस्ट बांधवांना आर्थिक मदतीचा हात परंडा प्रतिनिधी | दि. २७ मे २०२६ परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम मंगळवारी (दि. २६) येथील विश्रामगृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे हे होते. यावेळी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन…

अधिक बातमी वाचा...

भाजपकडून सुजितसिंह ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग; बावनकुळे यांची मुंबईत भेट

माझं गांव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत जोरदार…

अधिक बातमी वाचा...

मौजे बावची येथे जलतारा प्रकल्पाची पाहणी; गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांचे कौतुक

माझं गांव माझं शहर | परंडा परंडा तालुक्यातील मौजे बावची येथे सुरू असलेल्या जलतारा प्रकल्पाच्या कामाची पंचायत समिती परंडाचे गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत विस्तार अधिकारी शिंदे साहेब, विस्तार अधिकारी कुठे साहेब, इंजिनिअर पाटील साहेब तसेच ग्रामसेवक सौ. शितल गिरी उपस्थित होत्या. बावची येथील गट क्रमांक २३ मधील सामाजिक…

अधिक बातमी वाचा...

गायरान जमीन नियमित करा! परंड्यात दोन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

-परंडा  (प्रतिनिधी) –गेल्या ४६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या गायरान जमिनीच्या नियमितीकरणासाठी लढा देणाऱ्या दोन भूमिहीन शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध टोकाची भूमिका घेत २५ मे रोजी पासून परंडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उंडेगाव येथील अभिमान गोपीनाथ आठवले आणि आनाळा येथील नवनाथ सदाशिव ईटकर यांनी हा लढा पुकारला आहे. अभिमान आठवले हे १९८० सालापासून मौजे…

अधिक बातमी वाचा...

बार्शीत थरारक घटना : पत्नीवर चाकूचे तब्बल ५० वार करून पतीकडून निर्घृण हत्या

प्रेमविवाहानंतर सततच्या वादातून घडली धक्कादायक घटना; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर माझं गांव माझं शहर | बार्शी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि.२५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बार्शी शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेचे नाव धनश्री पाटील असे असून, आरोपी पतीचे…

अधिक बातमी वाचा...

प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी अखेर मंजूर

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेचा ठराव संमत; लवकरच निधी वितरण होणार माझं गांव माझं शहर | धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यात येणारा ५ टक्के निधी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या निधीच्या वितरणासाठी प्रहार संघटना यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मागील दिवाळीपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, प्रहार…

अधिक बातमी वाचा...

मराठवाडा मित्रपरिवार पुणे आयोजित माता-पिता गौरव पुरस्काराने पवार दांपत्याचा सन्मान

पुणे | प्रतिनिधी मराठवाडा मित्रपरिवार पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “यशस्वी उद्योजकांच्या आई-वडिलांचा गौरव सोहळा” उत्साहात संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमामध्ये परंडा तालुक्यातील यशस्वी उद्योजक रामभाऊ पवार यांच्या आई-वडिलांची गौरवासाठी निवड करण्यात आली होती. एमआयटी, पुणे येथे आयोजित या भव्य सोहळ्यात भगवान बाबुराव पवार आणि शालन भगवान पवार या दांपत्यांचा “माता-पिता पुरस्कार” देऊन सन्मान…

अधिक बातमी वाचा...

उच्च न्यायालयाचा दिलासा : परंडा बाजार समितीतील दुकाने तोडण्यास स्थगिती

परंडा, दि. २२ : परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कथित अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. संबंधित दुकानदारांना योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतीही तोडकाम कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. बाजार समितीने वृत्तपत्रातून नोटीस प्रसिद्ध करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई जाहीर केली होती. या निर्णयाविरोधात संबंधित…

अधिक बातमी वाचा...

कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करणारजिल्हाधिकारी श्री.पुजार

धाराशिव,दि. २३ मे (माझं गांव माझं शहर) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे मॅपिंग सुरू आहे.मात्र, २००२ मधील मतदार यादी आणि सध्याच्या यादीतील नावे जुळविताना विविध अडचणी निर्माण होत असल्याने कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ…

अधिक बातमी वाचा...

राज्यसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १८ जूनला मतदान

मुंबई : सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांनी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. संबंधित जागेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १ जून २०२६ पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून १८…

अधिक बातमी वाचा...

परांड्यात विशेष दिव्यांग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

३२ अस्थिव्यंग दिव्यांगांची तपासणी परंडा| माझं गांव माझं शहर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव, उपजिल्हा रुग्णालय परांडा आणि दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने परांडा येथे विशेष दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २३ मे २०२६ रोजी करण्यात आले. दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!