परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद गट जवळा (नि) येथे स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब भगवान पवार, पंचायत समिती गणाचे हनुमंत रामदेव कातुरे, सौ. प्रतिक्षाताई मुके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी च्या नेत्या वैशालीताई मोटे यांनी पदयात्रा व प्रचाराचा शुभारंभ जवळा गावचा दर्गा हजरत निजामुद्दीन या ठिकाणी नतमस्तक होऊन केला. यावेळी वैशालीताई मोटे यांचे समस्त ग्रामस्थ व कार्यकर्ते. माता भगिनींनी औक्षण करत स्वागत केले.
गेल्या अनेक दशकांपासून समाजकारण, राजकारण, संघटन उभारणी व सामाजिक न्याय या क्षेत्रांत राहुल मोटे यांनी केलेलं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. वंचित, शोषित, समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेला संघर्ष मी जवळून पाहिला आहे. समाजासाठीची निस्वार्थ धडपड, समाजाच्या हक्कांसाठी लढलेली लढाई आणि जनतेच्या प्रश्नांसाठी घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रश्नांकडे केवळ पाहण्यापुरते न थांबता, त्यावर उपाययोजना करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न नक्कीच वाखडण्याजोगे आहे असे मत वैशालीताई मोटे यांनी यावेळी व्यक्त केले.
मतदारांनी या जवळा गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नानासाहेब पवार व पंचायत समिती गणातील उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.