परंडा(प्रतिनिधी) परांडा तालुक्यातील भोंजा हवेली येथील शेतकरी गणपती दगडू कांबीलकर यांच्या शेतातील विजेच्या तारेला तार चिटकून शॉट सर्किट ने ५ एकर ऊसा सोबत शेतातील पी व्ही सी पाईप बोअर वायर आदि शेती साहित्य आगीमध्ये खाक झाले असून एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान तर त्यातील बचावातील पिक देखील आगीतून पार जळाले असून तब्बल ५ ते ७ लाखांचे नुकसान झाले असून संबंधित महावितरण विभागात संबंधित शेतकरी यांनी १/१०/२०२५ रोजी लिखीत अर्ज देऊन देखील विद्यूत तारांचे काम करण्यासाठी अर्ज केलेला असताना देखील दुर्लक्ष केल्याने शेवटी शेतकऱ्यांनचे नुकसान झाले असून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महावितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान..
