परंडा(माझं गांव माझं शहर) मराठ्यांचे क्रांतिसुर्य अखिल भारतीय छावा संघटना संस्थापक अध्यक्ष स्व. कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त छावा संघटना परांडा च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
परांडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कै आण्णासाहेब यांच्या सोबत असतानाच्या आठवनीना उजाळा दिला, आण्णासाहेब यांनी सामाजिक कार्य करत असताना स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही, तसेंच मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी त्यांनी लावल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, तालुका उपाध्यक्ष रामराजे काकडे, शहराध्यक्ष हरिभाऊ आदमीले, संतोष वारे, ढगपिंपरीचे रमेश गरड, बापूसाहेब हावळे, महादेव इतापे, पाचपिंपळा गोपीनाथ खैरे, विकास चव्हाण, संभाजी खैरे, पिंपरखेडचे मा. सरपंच नागनाथ थोरात, विद्यार्थी आघाडीचे सुलतान शेख, सूर्यराज खंडागळे, संस्कार गरड, नण्या पवार, समर्थ गोफणे, गणेश नलावडे, आदित्य हेळकर, धीरज चौधरी, अभिषेक कवडे, सोहंम हिवरे, माऊली ओहाल,
शिराळ्याचे धनंजय वाघमोडे, खासगाव चे सीताराम सातपुते, सुनील सातपुते, लोहारा मा. सरपंच विकास बैरागी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
