विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय हालचालींना वेग; धाराशिवच्या भाजप नेत्यांची महसूल मंत्र्यांशी महत्वपूर्ण भेट

माझं गांव माझं शहर मुंबई: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची मंत्रालय येथे धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

​आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ही भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी महसूल मंत्र्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

​या प्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, ॲड. अनिल काळे, ॲड. नितीन भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

​ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी, निवडणुकीच्या काळात झालेल्या या भेटीत धाराशिव जिल्ह्यातील पक्षीय बांधणी आणि आगामी रणनीतीवर खलबते झाल्याची चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!