धाराशिवमध्ये इंधन मागणीत वाढ; बीपीसीएल कडून सुरळीत पुरवठा सुरु

माझं गांव माझं शहर, धाराशिव: आपल्या मजबूत पुरवठा आणि वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) अखंड इंधन उपलब्धता सुनिश्चित करत आहे.वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे रिटेल आऊटलेट्स, डेपो कर्मचारी, वाहतूकदार आणि पुरवठा साखळी व्यवस्थापक समन्वयाने काम करत असून ग्राहकांना कोणताही अडथळा न येता सेवा दिली जात आहे.बीपीसीएलच्या माहितीनुसार, मे 2026 मध्ये धाराशिवमधील पेट्रोल विक्री 1,828.14 मेट्रिक टनांवर पोहोचली असून मे 2025 च्या तुलनेत त्यात 12.27 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, डिझेल विक्री 4,726.03 मेट्रिक टनांवरून 6,718.60 मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून 42.16 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. कृषी हंगाम आणि वाढलेल्या वाहतूक गरजांमुळे डिझेलची मागणी विशेषतः वाढल्याचे सांगण्यात आले.

वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी इंधन टँकरद्वारे नियमित पुनर्भरण, रिअल-टाइम साठा व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे. बीपीसीएल च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक लिटर इंधना मागे डेपो ऑपरेशन्स, टँकर हालचाली, साठा नियोजन आणि रिटेल व्यवस्थापन यांचे समन्वित प्रयत्न असतात.बीपीसीएलने महाराष्ट्रभर पुरेसा इंधन साठा राखून ठेवला असून वाढत्या मागणी दरम्यानही अखंड पुरवठा सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या व्यवस्थेमुळे शेती, मालवाहतूक, स्थानिक व्यवसाय आणि दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहण्यास मदत होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

error: Content is protected !!