अक्कलकोटमध्ये किराणा दुकानावर एफडीएचा छापा, 66 हजारांचा गुटखा जप्त

सोलापूर (माझं गांव माझं शहर) अक्कलकोट शहरातील खासबाग गल्ली परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत ६६ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी १२ जून रोजी दुपारच्या सुमारास खासबाग गल्ली येथील माउली किराणा स्टोअर्सची तपासणी केली. यावेळी राज्य शासनाने विक्रीस बंदी घातलेल्या विविध प्रकारच्या गुटखा, पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा दुकानात ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील उत्कर्षा मुकुंद एखंडे यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आप्पासाहेब ग्यानबा धुमाळ (वय ५५, रा. खासबाग गल्ली, अक्कलकोट) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

error: Content is protected !!