आला रे आला गुराखी आला ; घोषणा देत धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष  केला .

परंडा दि ९ : – परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल जाहिर होताच . भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जवळा (नि) गटातून १९२१ मताची लिड घेऊन विजयी घोषित झाल्या बरोबर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला . जल्लोष मिरवणूकीत , आला रे आला गुराखी आला असा शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यांना टोमणा मारणाऱ्या घोषणा देण्यात आल्या . शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रमेश उत्तम कारकर यांचेवर १९२१ मताधिक्याने धनंजय सावंत यांनी बाजी मारली आहे .
या निवडणूकीत चुलते पुतणे आमदार डॉ . तानाजीराव सावंत व धनंजय सावंत यांच्या प्रचार सभेतील टिका टिपण्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते .तशातच आमदार डॉ . तानाजीराव सावंत यांनी या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे वरचस्व कायम ठेवले . जिल्हापरिषदेच्या पाच गटात दोन जागा पटकावत , पंचायत समितीवर सहा जागा जिंकत पंचायत समिती ताब्यात घेतली .


जिल्हा परिषदेत विजयी उमेदवार: जवळा गटातून भाजप पुरस्कृत अपक्ष धनंजय सावंत , डोंजा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब खरसडे , शिवसेना शिंदे गटाचे शेळगाव गटातून अमर सुभाषराव मोरे , व अनाळा गटातून डोके वैशाली चंद्रकात , शिवसेना उबाठा गट पुरस्कृत राणी रेवणनाथ ढोरे हे उमेदवार विजयी झाले आहेत .


पंचायत समिती : जवळा गणातून शिवसेना शिंदे गटाचे परशू चंद्रकांत गवारे , शेळगाव गणातून रेष्मा अशोक गायकवाड , चिंचपूर गणातून गणेश बापूराव भिलारे , अनाळा गणातून मालन दादा कोलते , सोनारी गणातून समाधान सुभाष नलावडे , वडणेर गणातून अर्चना आण्णासाहेब जाधव तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासापूरी गणातून दिपाली महेश खुळे , डोंजा गणातून पंकज गोपाळ पाटील , लोणी गणातून शिवसेना उबाठा गटाच्या धनश्री विश्वास लोकरे , तर सिरसाव गणातून भाजपाच्या पाटील मोनिका केदार निवडूण आले आहेत . पंचायत समितीत भाजपला एका जागेवरच समाधान मानावे लागत आहे .

error: Content is protected !!