गायरान जमीन नियमित करा! परंड्यात दोन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
-परंडा (प्रतिनिधी) –गेल्या ४६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या गायरान जमिनीच्या नियमितीकरणासाठी लढा देणाऱ्या दोन भूमिहीन शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध टोकाची भूमिका घेत २५ मे रोजी पासून परंडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उंडेगाव येथील अभिमान गोपीनाथ आठवले आणि आनाळा येथील नवनाथ सदाशिव ईटकर यांनी हा लढा पुकारला आहे. अभिमान आठवले हे १९८० सालापासून मौजे…
