स्वामी समर्थ महाराज मंदिरातील महापंगतीसाठी किचनशेड बांधकामाचा शुभारंभ

माझं गांव माझं शहर | परंडा ता. २३ : शहरातील समर्थनगर परिसरातील स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे महापंगतीसाठी आवश्यक असणाऱ्या किचनशेड बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २२) उत्साहात करण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी व मंदिरातील धार्मिक कार्यक्रम अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने हे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये उद्योजक काकासाहेब साळुंके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विश्वजीत पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन आप्पासाहेब काशीद, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. श्रीकांत भालेराव, डॉ. सचिन मोरे, डॉ. कल्याणस्वामी देवस्थानचे संजयकुमार जहागीरदार, भाजपाचे विकास कुलकर्णी, राजाभाऊ पाटील, अभय पाटील, मधुकर भांडवलकर, अरुण बुरांडे, महादेव भोरे काका, कोळी अंकुश जमदाडे, शिवसेना (यूबीटी) चे रईस मुजावर, घाडगे, सौदागर टोंपे, सुनील बारस्कर, भारत गरड, पांडुरंग इंगोले आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषात बांधकामाचा शुभारंभ केला. मंदिर परिसरात भविष्यात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!