परंडा शहरातील सोमवार गल्लीत महावितरणचा भोंगळ कारभार; उघड्या मीटर पेटीमुळे अपघाताची भीती

परंडा | माझं गांव माझं शहर परंडा शहरातील सोमवार गल्लीतील कल्याण स्वामी मठासमोर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचे मीटर एकत्रितपणे बसवण्यासाठी उभारलेली मीटर पेटी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी ठरत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. संबंधित मीटर पेटी अत्यंत निष्काळजीपणे बसवण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जमिनीलगत उघडी मीटर पेटी स्थानिकांच्या माहितीनुसार, ही मीटर…

अधिक बातमी वाचा...

टेंभुर्णीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना शंभूराजे जगताप यांचे निवेदन; करमाळा एमआयडीसीच्या पाणीप्रश्नी तातडीच्या कारवाईची मागणी

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट; कृषीपूरक उद्योगांसाठीही स्वतंत्र आराखडा सादर माझं गांव माझं शहर | सोलापूर / टेंभुर्णी प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेल्या एमआयडीसी पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रमुख नेतृत्वाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची टेंभुर्णी येथे समक्ष भेट घेतली. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे…

अधिक बातमी वाचा...

स्वामी समर्थ महाराज मंदिरातील महापंगतीसाठी किचनशेड बांधकामाचा शुभारंभ

माझं गांव माझं शहर | परंडा ता. २३ : शहरातील समर्थनगर परिसरातील स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे महापंगतीसाठी आवश्यक असणाऱ्या किचनशेड बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २२) उत्साहात करण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी व मंदिरातील धार्मिक कार्यक्रम अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने हे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव येथे येडशी बस स्थानकात एस.टी. अधिकाऱ्यांकडून गणवेशाशिवाय प्रवाशांची तिकीट तपासणी; परिवहन मंत्र्यांकडे तक्रार, कारवाईची मागणी – राजाभाऊ राऊत

धाराशिव (माझं गांव माझं शहर) धाराशिव तालुक्यातील येडशी बस स्थानकात दोन एस.टी. अधिकाऱ्यांनी अधिकृत गणवेश, नावफलक व ओळखपत्राशिवाय प्रवाशांची तिकीट तपासणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक व विभाग नियंत्रक धाराशिव…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात विना परवानगी उभारलेले पुतळे सन्मानपूर्वक काढा : प्रशासनाचे आवाहन

माझं गाव माझं शहर | परंडा प्रतिनिधी :- परंडा शहरात शासनाची परवानगी न घेता उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे सन्मानपूर्वक काढावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंडा येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले तसेच तहसीलदार काकडे यांनी…

अधिक बातमी वाचा...

परंडा एस.टी. आगारात सवलत कार्ड वाटपात गोंधळ : एजन्सी प्रतिनिधी गैरहजर, नागरिकांचा संताप

परंडा, दि. १२ (माझं गांव माझं शहर) : परंडा येथील एस.टी. आगारात नागरिकांसाठी सवलत कार्ड वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्यामुळे अनेक वयोवृद्ध, महिला व दिव्यांग नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. सवलत कार्ड मिळवण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांनी एस.टी….

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!