परंडा : दि. ११(माझं गांव माझं शहर) नवनीत फाउंडेशनच्या वतीने बावची विद्यालयातील NMMS स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला नवनीत फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. घुगे साहेब प्रमुख उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी NMMS स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. प्रमोद डोके सर व श्रीमती पाटेकर मॅडम यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान श्री. प्रशांत घुगे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे तसेच शिस्तबद्ध वातावरणाचे विशेष कौतुक केले.
प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली.
हा सन्मान सोहळा विद्यालयासाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षकांच्या कार्याला मिळालेली ही पावती असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.