परंडा येथे भाजपा कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

परंडा,दि.११(माझं गांव माझं शहर) :- महिला शिक्षण आणि समानतेच्या अधिकारासाठी आयुष्यभर लढणारे सामाजिक क्रांती आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक सत्तार पठाण, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, श्री. विकास कुलकर्णी, श्री. विलास गायकवाड, श्री. साहेबराव पाडुळे, परसराम कोळी, श्री. रामकृष्ण घोडके, श्री. सुरज काळे, श्री. जयंत भातलवंडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!