बावची विद्यालय, येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री. प्रभाकर मिरगणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांच्यासह श्री. सचिन मोरे सर, श्री. प्रमोद डोके सर, श्री. विकास वाघमारे सर, श्री. गोकुळ मासाळ सर, श्री. प्रभाकर मिरगणे सर, शुभम रोडगे सर, श्री. सुरज वळवी सर, श्री. संदीप अनभुले सर, पूजा रोडगे मॅडम, ऋतुजा गायकवाड मॅडम, कोमल करळे मॅडम तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या आदर्शांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीपर घोषणांनी भारावून गेले होते. शेवटी सर्वांनी शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन राष्ट्रसेवेची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.

error: Content is protected !!