कपिलापुरीतील महिलांशी शैला वेताळ यांनी साधला संवाद.

परंडा (प्रतिनिधी) कपिलापुरी, कारंजा, आवार पिंपरी, सिंचन क्षेत्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
लोणी गटातील वडनेर गणातून मैदानात उतरलेल्या शैला वेताळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा पुरस्कृत उमेदवार शैला वेताळ यांनी विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आधारित प्रचाराला गती दिली आहे. रविवारी त्यांनी कपिलापुरीच्या पंचक्रोशीत थेट महिलांच्या भेटीगाठी घेऊन व संवाद साधून आपलं भविष्यातील व्हिजन मोठ्या सक्षमतेने मांडत आहेत.

त्यांच्या भेटीगाठी व संवादातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना लाभत आहे. ‘नाव नव्हे तर काम आणि कर्तृत्व महत्त्वाचं’ अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीचे व्हिजन, व ग्रामपातळीवर राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व देवेंद्र फडवणीस यांचा विकास कामांचा वारसा ग्रामस्तरावर पुढे नेताना विकासाचा आराखडा मांडला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिलांसाठी सुविधा आणि वडनेर मतदार संघातील वाड्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी एक व्हिजन घेऊन आले आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षाच्या विकास दिशेची संकल्पना घेऊन मी मतदारांच्या समोर जात आहे. भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचं खंबीर नेतृत्व व पाठबळ या आधारावर शासन स्तरावरून
निधी खेचून आणण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे. जनतेचा विश्वास हा कामातून मिळवायचा असतो,’ असे ठाम मत शैला वेताळ यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!