परंडा येथे जागतिक क्षयरोग दिन जनजागृती कार्यक्रम संपन्न.


परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा आणि डॉ दीपक निंभोरकर तालुका आरोग्य अधिकारी व डॉ जुबेर मोमीन वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन 2026 हा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला. डॉ अतुल हुंबे व डॉ शहाजी चंदनशिवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ महेशकुमार माने हे उपस्थित होते तर व्यासपीठावर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी डॉ विकास पवार क्षयरोग औषधोपचार पर्यवेक्षक श्री दत्ता अडसूळ आरोग्य निरीक्षक गाळणे आशिष आरोग्य कर्मचारी साईप्रसाद बनसोडे तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ किरण देशमुख प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे डॉ शहाजी चंदनशिवे प्रा दीपक हुके प्रा अंकुश शंकर प्रा संभाजी धनवे प्रा रामेश्वर गायकवाड व प्रा पवार डी जे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अतुल हुंबे यांनी केले. यावेळी डॉ विकास पवार आणि दत्ता अडसूळ यांनी क्षयरोग दिनाचे औचित्य साधून आपल्या मार्फत समाजामध्ये क्षयरोगाविषयीची अंधश्रद्धा व जनजागृती होणारा खर्च आणि वेळ वाचवा गरीब कुटुंबासाठी याची मदत मिळावी व ते कुटुंब सुखी जगावे या मागच्या उद्देशाला अनुसरून हा कार्यक्रम शासनाने दिला असल्याचे आपल्या मनोगत मध्ये सांगितले. यावेळी त्यांनी क्षयरोगाची लक्षणे प्रतिबंध आणि उपचार यासंदर्भात सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!