प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर)राज्य परिवहन महामंडळाच्या परंडा आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या कष्टकरी संघटनेच्या फलकाचे अनावरण एसटी कष्टकरी जनसंघाचे राज्य समन्वयक श्री सागर बादगुडे व धाराशिव विभागीय सचिव श्री सतीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
धाराशिव विभागीय कार्याध्यक्ष विनोद कुंभार ,माजी विभागीय सचिव दत्ता मुंडे ,तुळजापूर आगाराध्यक्ष नितीन इंगळे, सचिव सुधीर सोनवणे, सुनील सिडाम, सचिन सगट उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राज्य समन्वयक सागर बादगुडे यांनी आगारातील संघटन मजबूत करावे व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करावे या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी परंडा आगाराचे जनसंघाचे प्रमुख मार्गदर्शक बजरंग गोरे, माजी अध्यक्ष विठ्ठल तौर, कार्याध्यक्ष राजु अलबत्ते, नूतन अध्यक्ष संतोष व्हटकर, सचिव श्रीरंग गुरव, तात्यासाहेब पिंगळे,नाना बांगर , तानाजी शिंदे, झुंबर तरंगे ,आप्पा खोगरे ,मिलिंद कांबळे, बालाजी अलबत्ते, दादा शिंदे, इमरान शेख, विनोद बिक्कड ,नितीन डुकरे, गिरी महाराज, नितीन गरड ,अतुल शिंदे व अर्ष पटेल इत्यादी सदस्य उपस्थित होते