अनाळा , (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेत दि. १० रोजी आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते . आनंद बाजाराचे उदघाटन माजी जि . प . सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुण करण्यात आले .यावेळी संस्थेचे सहसचिव वसंत हिवरे , रिपाई चे तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे , हभप ईश्वर महाराज ईटकर मु. अ. जयकुमार भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती . या आनंद बाजारास आनाळा व परिसरातील पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना व्यवहार रूपी कौशल्ये समजून विद्यार्थ्यांना आर्थिक देवानघेवाणीचे महत्व आत्मसात करण्यासाठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते . या आनंद बाजारातून ६७४५६ रुपयाची विक्री झाली.या बाजारात १०० विद्यार्थी विक्रेत्यांनी पालेभाज्या, फळभाज्या इतर खाद्यपदार्थ इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक साहित्य व स्टेशनरी स्टॉल वस्तू वेगवेगळ्या प्रकारचे गमती जमती चे खेळ या सर्वांचा समावेश होता. यावेळी सर्व पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते .